जुनी सांगवी परिसरातील गॅस शवदाहिनी चार दिवस राहणार बंद
पिंपरी, ता. १७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील जुनी सांगवी येथे वसंतदादा पुतळा, बसस्टॅन्ड समोर उभारण्यात आलेल्या पालिकेच्या सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये बिघाड झाल्याने शवदाहिनी चार दिवस बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ह क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ यांनी गुरुवारी (ता. १६) दिली. जुनी सांगवी येथील सीएनजी गॅस शवदाहिनीत अंत्यसंस्कारासाठी पिंपरी मनपा क्षेत्रातील विविध ठिकाणाहून नागरिक येतात. सीएनजी गॅस शवदाहिनीच्या इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनलमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी मे.एन.वाय.सी. एंटरप्रायजेस यांना चालन, देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. तरीही हे काम पूर्ण होण्यास चार दिवस लागणार असल्याचे दिलीप धुमाळ यांनी सांगितले. यामुळे जुनी सांगवी परिसरातील सीएनजी गॅस शवदाहिनी चार दिवस बंद राहील. याची महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. -------
