जुम्मापट्टी येथे देशी रोपांची लागवड
पिंपरी, ता. ४ : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने रायगड जिल्हा कर्जत तालुक्यातील जुम्मापट्टी येथे आंबा, चिंच, कडुनिंब, वड, पिंपळ, खैर अशा विविध प्रकारच्या १०० झाडांचे वृक्षारोपण संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
संस्कार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी ५००० वृक्ष लागवटीचे ध्येय ठेवले जाते. यावर्षी आतापर्यंत २६०० झाडाचे वृक्षारोपण विविध भागात केले आहे. यावेळी रा. जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता म्हात्रे, शिक्षिका गीता पाटील, छाया चव्हाण, वैशाली ढोले आणि प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे, प्रभाकर मेरुकर वसंत दळवी, तानाजी भोसले, जयवंत सूर्यवंशी, रोहित मोरे, सायली सुर्वे, संध्या स्वामी, मोहिनी सूर्यवंशी आदींनी वृक्षारोपणात सहभाग घेतला.
-----