26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने 'सिटी व्हिजनिंग वर्कशॉप' कार्यशाळा संपन्न

पिंपरी, ता. ४ :  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ( ता. ५) पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य आणि समाज विकास विभाग आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई व युनिसेफ मुंबई, युमिकोर ऑटोकॅट इंडिया (CSR भागीदार) यांच्या सहकार्याने व विदाउट बाय आशया यांच्या सहयोगाने सोमवारी ( ता. २ ) "लोकलायझिंग प्लास्टिक ॲक्शन थ्रू कम्युनिटीज़ (LPAC)" उपक्रमाअंतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 


यावेळी ‘विदाउट बाय आशया’ या startup सुविधेमध्ये २५ महिला बचत गट (SHG) सदस्यांना प्लास्टिक पुनर्वापर या विषयावर माहितीपर भेट आणि मार्गदर्शित फेरी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. शहरातील महिला बचत गटांनी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड मानहानगरपालिका आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आयोजित ' सिटी व्हिजनिंग वर्कशॉप ' कार्यशाळेमध्ये पिंपरी चिंचवड क्षेत्रातील प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर कार्य करणारे काही स्थानिक घटक शहरस्तरीय प्लास्टिक पुनर्वापर या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यास एकत्रित आले होते. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश प्लास्टिक प्रदूषण नष्ट करण्यासाठी संस्थात्मक उपाय शोधणे आणि स्थानिक स्तरावर परिपत्रिक अर्थव्यवस्थेचा प्रभावी आदर्श निर्माण करणे हा आहे. आजच्या कार्यशाळेने या वैचारिक प्रयोगाचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवले. 



या कार्यक्रमाद्वारे या परिवर्तनाच्या संकल्पनेला व्यापक रूप देण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यात आले, ज्यामध्ये SHG महिला प्लास्टिक कचरा व्यवस्थापन साखळीत सक्रियपणे सहभागी होत आहेत. ‘श्रीकृष्ण महिला बचत गट’ (क प्रभाग) यांनी शून्य कचरा प्रकल्पांतर्गत ४० किलो MLP गोळा करून 'Without' स्टार्टअपला पुनर्वापरासाठी दिले.



या फेरीदरम्यान, स्वयं सहायता बचत गटातील महिलांना प्लास्टिक कचरा पुनर्वापर प्रक्रियेची सखोल माहिती मिळाली आणि पुनर्वापर व प्रदूषण कमी करण्याच्या शक्यतांचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या महिलांना 'Without' निर्मित प्लॅस्टिक पुनर्वापरातून केलेली फुलझाडांची कुंडी आणि इतर भेटवस्तू Umicore Autocat India Pvt. Ltd कडून देण्यात आले.

—--

कोट -  

आरोग्य विभागाच्या साथीने "लोकलायझिंग प्लास्टिक ॲक्शन थ्रू कम्युनिटीज़ (LPAC)" उपक्रमाअंतर्गत शहरातील स्वयं सहायता बचत गटातील महिलांना ‘प्लास्टिक कचरा पुनर्वापर’ प्रक्रियेची सखोल माहिती देणारा कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील बचत गटांच्या महिलांना अशा उपक्रमाच्या माध्यमातून हाताला काम मिळवून देण्याचा प्रयत्न महापालिकेचा समाज विकास विभाग सातत्याने करत आहेत. 

ममता शिंदे 

उप आयुक्त , समाज विकास विभाग , पिंपरी चिंचवड महानगरपालिका. 

—------