गुरूपौर्णिमेनिमित्त श्री साई मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी, ता. २० : गुरूपौर्णिमेनिमित्त आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये रविवारी (ता. २१) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष व निमंत्रक सुभाष नेलगे यांनी दिली.
यासंदर्भात नलगे यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, '' गुरूपौर्णिमेनिमित्त शनिवारी पहाटेपासून सुरू झालेल्या महोत्सवाची सांगता सोमवारी होणार आहे. यामध्ये रविवारी (दि. २१) पहाटे पाच वाजता ' श्रीं ' ची काकड आरती, सनई वादन, मंगलस्नान, श्री साई चरित्र पारायण प्रारंभ, सकाळी ७ वाजता ' श्रीं ' ची आरती, ८ ते ९ रुद्राभिषेक, यानंतर दुपारी १२ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत माध्यान्ह आरती होणार आहे. सायंकाळी पाच ते दहा भजन संध्या, ५:३० वाजता पालखी पूजा व मिरवणूक, सायंकाळी ७ वाजता धुपारती आणि रात्री ११ वाजता हरीजागर होईल. तसेच सोमवारी ( दि. २२) सकाळी सात वाजता आरती, ९ वाजता श्रींचे कीर्तन, ११ वाजता गोपाळ काला, १२ वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी सात वाजता दुपारती, ७:३० पालखी पूजा व मिरवणूक, रात्री दहा वाजता शेजारती होऊन कार्यक्रम सांगता होईल.''
.....................................