' एबीबीएम ' तर्फे खानापूरला रविवारी वृक्षारोपण
पिंपरी, ता. १४ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे यांच्या वतीने रविवार (ता. १५) खडकवासला बॅकवॉटरजवळ, खानापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी नवीन झाडे लावण्यात येणार आहेत. सकाळी ८ ते १० या वेळेत हा कार्यक्रम होईल. साहित्य, खड्डे तयार असतील, फक्त झाडें लावणे, प्रत्येकाने विशेषतः मुलांनी देखील यात सहभागी व्हावे. तीन वर्षांपूर्वी आपण लावलेली झाडें आता मोठी झाली आहेत. या झाडांचा तिसरा वाढदिवस झाडांना औक्षण करुन साजरा करण्यात येणार आहे.
-----------