24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

डूडूळगाव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी, ता . ९ : इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. ३, डूडूळगाव येथील १ अनधिकृत पत्राशेड बांधकामावर अंदाजे ६१६८ चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि इ क्षेत्रीय धडक कारवाई पथकामार्फत ही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. शहर अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी कार्यकारी अभियंता सुर्यकांत मोहिते, उपअभियंता राजेश जगताप, कनिष्ट अभियंता संदीप वैद्य यांच्या अधिपत्याखाली महापालिका अतिक्रमण धडक पथक, ३ बीट निरीक्षक, २३ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, १ पोलीस उपनिरीक्षक, ५ पुरुष पोलीस, ४ महिला पोलीस, ५ मजूर यांच्या उपस्थितीत २ जेसीबी यंत्रासह निष्कासनाची कारवाई करण्यात आली.

--------------