छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात
पिंपरी, ता. १५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (ता. १४) उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस तसेच बर्ड व्हॅली येथील त्यांच्या शिल्पास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, सामाजिक कार्यकर्ते धनाजी येळकर पाटील, काशिनाथ नखाते, जीवन बोराडे, सागर तापकीर, अजित लायगुडे, संदीप थोरात, संजय जाधव, सचिन ढोबळे, अंगद जाधव, जितेंद्र छाबडा, श्रीकांत देसाई आदी उपस्थित होते.
--------------
