चिंचवडमधील ' गणेश मूर्ती बनवा ' कार्यशाळेत ३५ जणांचा सहभाग
पिंपरी, ता. ४ : चिंचवड येथील एआयसीटी डिझाइन अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश मूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एआयसीटी डिझाइन अकॅडमीने ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. जी अत्यंत यशस्वी ठरली. विशेषत: पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनविण्याच्या तंत्रांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विविध पार्श्वभूमीतील सहभागी झालेल्या स्पर्धकांनी मूर्ती बनविण्याचा आनंद घेतला. गणेशोत्सवासाठी सुंदर आणि टिकाऊ मूर्ती तयार करण्याची संधीचे सोने केले.
कार्यशाळेत एआयसीटीच्या संचालिका लीना सप्रा उपस्थित होत्या. आणि वास्तुविशरद अपर्णा शिंदे यांनी सहभागींना मूर्ती बनवण्याच्या सखोल प्रक्रियेचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाने सांस्कृतिक अध्यात्मिक प्रथांमध्ये पर्यावरण-जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि उपस्थित सर्वांनी याचे कौतुक केले. दिवसेंदिवस वाढत चालेले प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. पाण्यात सहज विरघळेल अशा मूर्ती बनवण्यासाठी एआयसीटी डिझाइन अकॅडमीने पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून पारंपारिक कलेला आधुनिकतेची जोड देवून टिकाऊ पद्धतींच्या संमिश्रणाने सर्जनशील प्रतिभेचे दर्शन घडवले. आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती सप्रा यांनी दिली.
---------------