चिंचवडला विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कार्यशाळा
पिंपरी, ता. २ : राज्य शासनाच्या उद्योग,उर्जा व कामगार विभागाच्या वतीने दि.२६ जून ते २ जुलै २०२४ या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यामित्ताने पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि विद्युत निरीक्षण विभाग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे “विद्युत सुरक्षितता” कार्यशाळेचे सोमवारी (ता. १) आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता संजय खाबडे, बाबासाहेब गलबले, विद्युत निरक्षण विभाग पुणेचे शाखा अभियंता महेंद्र जगताप, सहाय्यक विद्युत निरीक्षक निलेश मूळूक, अभिजित शिंदे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, अनुश्री कुंभार,समीर दळवी, माणिक चव्हाण, महेश कावळे, वासुदेव मांढरे, सचिन नांगरे, दिलीप धुमाळ, बाळू लांडे यांच्यासह महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधील विद्युत विभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, वीज पर्यवेक्षक, वायरमॅन, इलेक्ट्रिकल कंत्राटदार उपस्थित होते.
या प्रशिक्षण सत्रात विद्युत अपघात होऊ नये, यासाठी घ्यावयाची पूर्व दक्षता, विद्युत अपघात झाल्यास परिस्थिती हाताळताना घ्यावयाची काळजी तसेच राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याद्वारे विद्युत विषयक अधिनियम २००३, २०२३ यासोबतच वेळोवेळी केलेले कायदे, अधिसूचना यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पावसाळ्यात होणा-या विद्युत संबंधित दुर्घटना, अपघात याबाबत घ्यावयाची दक्षता, आपत्कालीन परीस्थित्त करावयाच्या उपाययोजना, नवीन प्रकल्प उभारताना विद्युत विषयक कामांचा दर्जा उंचावणे, देखभाल करणे, विद्युत संच मांडणी करणे, निवासी व औद्योगिक भागांमध्ये पायभूत सुविधा निर्माण कराताना ’विद्युत सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता’ या सूत्रावर आधारित सुविधा निर्माण करणे तसेच वीज विषयक नियम न पाळल्यास होणारी कारवाई याबाबत मार्गदर्शन या सत्रात करण्यात आले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ अभियंता दिपाली धेडे यांनी केले तर आभार सह शहर अभियंता संजय खाबडे यांनी मानले.
-------------
