चिंचवडकरांच्या चिंचवडला सैन्याला नमन
पिंपरी, ता. २४ : भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू चौक ते महासाधू मोरया गोसावी क्रीडांगण केशवनगर अशा तिरंगा फेरीचे ‘राष्ट्रप्रेमी चिंचवडकर’ नागरिकांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
या फेरीला चिंचवडकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रॅलीत चिंचवडगावातील स्थानिक माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे व माजी स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, सामाजिक कार्यकर्ते हर्षद नढे, अजित कुलथे, कैलास सानप, प्रदीप सायकर, शिवम डांगे, नूतन चव्हाण, सुरेखा जाधव, महेश मिरजकर, आदित्य रेवतकर, अतुल कांबळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह चिंचवडकर नागरिक सहभागी झाले होते.
------------
