बारामतीतील कोजागिरी पौर्णिमेत २०० जणांचा सहभाग
बारामती, ता. २२ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात जवळपास २०० लोकांनी सहभाग घेतला. लहान मुलांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या आयोजनात बारामती तालुका, जिल्हा संपर्क प्रमुख केदार सुभेदार, महिला आघाडी अध्यक्ष मेधा पळशीकर, तसेच मार्गदर्शक ज्योती ताई देशपांडे, पदाधिकारी सुप्रिया सावरकर तसेच तालुका कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले.
उत्तम व वेळेवर नियोजन, लोकांना व्यक्तिगत फोन करुन दिलेली आमंत्रणे, विविध पारंपरिक,सांस्कृतिक खेळांचे आयोजन , मिळालेला प्रचंड प्रतिसाद या सर्व जमेच्या गोष्टी बारामती शाखेला यशाच्या शिखरावर घेऊन गेल्या. कार्यक्रम उत्तम झाला, आम्हाला परत सहकुटुंब सहभागी होण्यास आवडेल अशा प्रत्येकाची प्रतिक्रिया बघायला व ऐकायला मिळाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जोशी, श्रीयश सकोजी, अमित पाटील सर यांनी उत्तम नियोजन केले. महिला पदाधिकारी जयश्री दाते, अरुंधती खंडागळे, स्वाती कुलकर्णी यांनी मनोरंजनाच्या खेळाची जबाबदारी घेऊन यशस्वी करुन दाखवला. वातावरण निर्मिती होऊन कार्यक्रमालाअजून रंगत आली.
कार्यक्रमाला बारामतीमधील प्रतिष्ठित डॉ. पुरंदरे, डॉ. खरे, डॉ. ढोले यांनी वेळात वेळ काढून हजेरी लावली.
समाज हितासाठी सगळ्यांनी संघटित होऊन काम केले पाहिजे, असे मत सगळ्यांनीच व्यक्त केले.
-----
