बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पिंपरी, ता. १ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच निगडी येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन प्रसंगी शहर अभियंता मकरंद निकम,माजी नगरसदस्या सुमन पवळे, अनुराधा गोरखे,कमल घोलप, शर्मिला बाबर, क्षेत्रिय अधिकारी अतुल पाटील,सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
--------
