24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव ७ जूनपासून


पिंपरी, ता. ५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संगीत अकादमी वर्धापन दिनानिमित्त अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनातून "भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४" चे आयोजन दि.०७ ते ०९ जून २०२४ या कालावधीत सायं ५.३० ते रात्री १० अखेर आकुर्डी येथील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह करण्यात आलेले असून सदर कार्यक्रम नागरीकांसाठी विनामूल्य आहे.


कार्यक्रमाचा तपशील व रुपरेषा खालील प्रमाणे.


शुक्रवार


दि. ०७ जून, २०२४

सायं ५.३० वा.

"भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२४" या कार्यक्रमाचे उदघाटन, दिपप्रज्वलन व पाहुण्याचे स्वागत


सायं ६.०० वा.

डॉ. भरत बलवल्ली यांचे शास्त्रीय गायन


सायं ७.३० वा.

डॉ. आश्विनी भिडे देशपांडे यांचे शास्त्रीय गायन


शनिवार


दि. ०८ जून, २०२४


सायं ५.३० वा.

संगीत अकादमी विद्यार्थी सादरीकरण


सायं ६.०० वा.

पं. सुधारक चव्हाण यांचे शास्त्रीय गायन


सायं ७.०० वा.

उ. शाकीर खान, तेजस उपाध्ये, यांचे सतार, व्हायोलिन जुगलबंदी


सायं ८.०० वा.

पं. श्रीनिवास जोशी व श्री. विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन


सायं ९.०० वा.

पं. दिपक महाराज यांचे कथ्थक नृत्य


रविवार


दि. ०९ जून २०२४


सायं ५.३० वा.

श्री. नंदीन सरीन यांचे शास्त्रीय गायन


सायं ६.०० वा.

कृष्णा बोगांणे, अंकिता जोशी जसरंगी सहगायन


सायं ७.०० वा.

विदुषी देवकी पंडीत याचे शास्त्रीय गायन


सायं ८.०० वा.

पं. रघुनंदन पणशीकर यांचे शास्त्रीय गायन


या सर्व कार्यक्रमांस शहरवासियांनी उपस्थित राहून गीतगायन कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

------------