अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी प्रशस्त पार्किंगची व्यवस्था : आयुक्त शेखर सिंह
पिंपरी, ता. १८ : '' पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात एकाच ठिकाणी अधिक मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी महापालिका आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ( वाहतूक शाखा) यांच्या सहकार्याने मतदारांच्या सोयीसाठी प्रशस्त वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी मतदारांनी वाहन पार्किंग करावे'', असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या मतदार संघामध्ये मतदान केंद्रांच्या १०० मीटर अंतराबाहेर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून ज्या ठिकाणी मतदान केंद्रांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी इमारत केंद्रांपासून २०० मीटर अंतराबाहेर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेच्या हद्दीत ८ पेक्षा अधिक मतदान केंद्र असलेले २७ ठिकाणे आहेत.
मतदान केंद्राचे ठिकाण, पत्ता केंद्र क्रमांक
पार्किंग व्यवस्था ठिकाण
१. जी.के.गुरुकुल समोर गोविंद गार्डन पिंपळे सौदागर
३४५ ते ३५१ व ३६१ ते ३६४, ३६६ ते ३७१
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर गोविंद गार्डन ब्रिजच्या बाजूस व विबग्योर चौकाच्या समोरील बाजूस रोडच्या कडेला.
२. म.न.पा. मुले आणि मुली शाळा क्र.५४ /१ पिंपळे गुरव नवीन इमारत ३९६ ते ४०९
पेट्रोलपंप समोरील सार्वजनिक रोडच्या कडेला
३. म.न.पा. प्राथमिक शाळा मुले आणि मुली नवीन इमारत वाकड ४३७ ते ४५१
संजय कळते कंपनी यांची मोकळी जागा व गावठानाकडे जाण-या रस्त्याला पार्किंसाठी जागा उपलब्ध आहे.
४. विज्डम इंग्लिश मेडियम हायस्कूल, विकासनगर किवळे ६ ते १६
मतदान केंद्रापासून २०० मीटर लांब रस्त्याच्या कडेला
५. बाबूरावजी घोलप माध्य.व उच्च माध्य.विद्यालय, शाळा, नवी सांगवी ४९८ते ५०८ व ५१९ ते ५२१
शनिमंदिर मैदान मैदानात
६. यशवंतराव चव्हाण म.न.पा.शाळा , क्र. ६०/१ थेरगाव २१८ ते २२९
बाबूजीबुवा उद्यान थेरगाव, समोर व रस्त्याच्या बाजूला.
७. म.न.पा. शाळा मुले आणि मुली शाळा क्र.५४/२ नवीन इमारत २, पिंपळे गुरव ४१० ते ४१९
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला
८. विद्याविनय निकेतन विद्यालय (ज्ञानोबा चौधे शाळा)विशालनगर, पिंपळे निलख ४६८ ते ४७८
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला
९. बी.टी.मेमोरियल इंग्लिश मेडियम स्कूल ओमसेंट्स हायस्कूल १८७ ते १९६ काळेवाडी
लकी बेकरी समोरील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला.
१०. गुरुमय्या प्रायमरी स्कूल चिंचवडे नगर ७६ ते २५
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतराबाहेर सार्वजनिक रोड लगत पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.
११. श्री.फत्तेचंद जैन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज १२५ ते १३२ व १४४ ते १४५
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतराबाहेर सार्वजनिक रोड लगत पार्किंग ची व्यवस्था करण्यात आली आहे.
१२. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय से.नं.२५ निगडी
ज्ञानप्रबोधिनी स्कूल राजनंदा बंगल्यासमोरील रस्त्याच्या कडेला.
१३. सेंट उर्सुला हायस्कूल निगडी
उर्सुला शाळा एन,आय.बी.आर.कॉलेज नोवेल गेट समोर रस्त्याच्या कडेला
१४. गणेश इंग्लिश मेडियम स्कूल दापोडी,
दापोडी शीतल देवी चौक ते पिंपळे गुरव रस्त्यालगत म्हाडाच्या मोकळ्या अंदाजे दीड एकर प्लॉटच्या जागेवर काटे वृंदावन हौसिंग सोसायटी समोर कडेला
१५. हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर दापोडी,
दापोडी रेल्वे फाटक ते दापोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जाणा-या ४० फुटी रस्त्यावर २०० मीटरच्या पुढे तसेच ११ नं.बसस्थानकाच्या १०० फुटी सार्वजनिक रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूस
१६. नागेश्वर हायस्कूल, गणेश नगर, मोशी
नाशिक पुणे महामार्गालगत सस्ते वस्ती येथील खाजगी मोकळी जागा आणि भारतमाता चौक ते आळंदी रोड लगत जय गणेश लोन्स समोर रस्त्याच्या कडेला
१७ . म.न.पा. प्राथमिक शाळा नं.१०६, १०७,मोशी गावठाण सावित्रीबाई फुले
मोशी आळंदी रस्त्यावरील नागेश्वर मंदिर देवस्थान यांची खाजगी मोकळ्या जागी
१८. म.न.पा. शाळा नं.८७ जाधववाडी साई जीवन प्रायमरी स्कूल
शाळेच्या पाठीमागील बाजूच्या मैदानावर पार्किंग व २०० मिटरच्या बाहेर अंतर्गत सार्वजनिक रस्त्याच्या कडेला एका बाजूस
१९. म.न.पा. पब्लिक स्कूल कै. महादू श्रीपती सस्ते प्रायमरी स्कूल मुले व मुली शाळा बोराडेवाडी नं १३
शिवशंभो कॉलनी कस्तुरी सोसायटीच्या समोरील रस्ता व बोराडेवाडी चौक ते कृषी प्रदर्शनकडे जाणारे मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूस
२०. श्रीमती शेषाबाई देवराम गणगे प्रशाला कृष्णानगर
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर ओमसाई बंगल्या समोरील सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या मोकळ्या जागेत
२१. सेंट अॅन्स स्कूल त्रिवेणी नगर
सेंट अॅन्स स्कूल त्रिवेणी नगर चौक सचिन तरुण मित्र मंडळ कृष्णानगर समोरील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला
२२. म.न.पा. पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा सी-४३ च-होली बुद्रुक
क्रांती चौक येथे पार्किंग करू शकतो व शालेच्या उजवीकडील बाजूस तसेच शाळेच्या डावीकडील बाजूस हॉटेल गरीब नवाज केटरर्स समोरील सार्वजनिक रस्त्यालगत
२३. स्टर्लिंग स्कूल इमारत क्र. इंद्रायणी नगर
शाळेपासून २०० मीटर लाईनच्या पुढे धावडे वस्ती बस डेपोकडे जाणा-या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला
२४. स्वामी समर्थ इंग्लिश मेडियम स्कूल प्रायमरी इंद्रायणीनगर
पिंपरी चिंचवड म.न.पा.संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल इंद्रयानीनगर या जागेत
२५. समता प्रायमरी/सेकंडरी विद्यालय चक्रपाणी वसाहत
गणराज कॉलनी गल्ली नं.५ ते समोरील आयुष इंजीनियरिंग कंपनीच्या खाजगी जागेत व त्यालगतच्या सार्वजनिक रस्त्याची कडेला
२६. एस.एन.बारसे सेकंडरी विद्यालय दिघी रोड भोसरी
शाळेपासून २०० मिटर लाईनच्या पुढे भोसरी – दिघी रोडवर साईडला मुख्य सार्वजनिक रस्त्याच्या कडेला
२७. रामचंद्र गायकवाड प्रायमरी सेकंडरी विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज दिघी
मतदान केंद्रापासून २०० मीटर अंतरावर राघव मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या मैदानात
महापालिका आणि पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या ठिकाणी नागरिकांनी वाहने पार्किंग करावेत असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
