' आयटीआय ' च्या विद्यार्थ्यानी गिरविले ' ऑन जॉब ट्रेनिंग ' चे धडे
पिंपरी ,ता. १७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयटीआय मोरवाडी येथील विद्यार्थ्यांनी फोर्ब्स मार्शल या कंपनीत नुकतेच ' ऑन जॉब ट्रेनिंग ' (OJT) पूर्ण केले.
केंद्र सरकारच्या ' डीजीटी ' च्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेत असताना कंपनी आस्थापनामध्ये ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) घेणेबाबत सूचित केले आहे. इन्स्टिट्यूट व इंडस्ट्रीयामधील संवाद वाढावा व विद्यार्थ्यांना कंपनीमधील अद्यायावत ज्ञान मिळावे, तेथील मशिनरी , साहित्य उपकरण, कामकाज व्यवस्थापन, संवाद कौशल्य, कायझन पद्धत, गुणवत्ता मोजमापन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी ' ऑन जॉब ट्रेनिंग ' घेणे महत्त्वाचे असते.
त्यानुसार फोर्ब्स मार्शल या नामांकित कंपनीने याबाबत सकारात्मक दर्शवून वेल्डर, पेंटर जनरल, आरेखक यांत्रिकी व टर्नर या ट्रेड्सच्या सुमारे ६५ विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये ओझेटीच्या माध्यमातून जानेवारी ते जून २०२४ या कालावधीत प्रत्येक व्यवसाय करिता एक महिना व सात दिवस या कालावधीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रामधील अद्ययावत प्रशिक्षण तसेच इतर महत्त्वपूर्ण कामकाज व्यवस्थापन प्रणालीबाबत एक महिन्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले.
यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संस्थेमध्ये झाला. त्यावेळेस फोर्ब्स मार्शल कंपनीचे संचालक वीरेंद्र गिल, सीएसआर व्यवस्थापक प्रीती किबे, सी. एस. धामणकर व प्रसाद वैद्य आदी उपस्थित होते..
वीरेंद्र ग्रील यांनी विद्यार्थ्यांना ' ऑन जाॅब ट्रेनिंग ' बालपणापासूनच सुरू होते व पुढे ते कशाप्रकारे अंगीकारावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्यक्ष उत्पादनाचे ' रिजेक्शन ' होणार नाही व गुणवत्ता अशा प्रकारे राहील याबाबत माहिती दिली. प्राचार्य शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कंपनीतील कामकाज, शिस्त, संवाद कौशल्य व पुढील करिअरच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रिती किबे यांनी तांत्रिक क्षेत्रातील महिला सक्षमीकरणाचे महत्व व कंपनीचे याबाबतचे उद्देश नमूद केले .
संस्थेमार्फत निदेशक निलेश लांडगे यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम साळोखे, सतीश गायकवाड, भानुदास दुधाळ यांनी कार्यक्रमाची व्यवस्था केली. गटनिदेशक किसन खरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.
------