24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रम

पिंपरी, ता. १९ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील विविध भागात १३ ठिकाणी योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याअंतर्गत २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध बॅडमिंटन हॉल येथे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योग दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.


संपूर्ण जगभर २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध भागात क्षेत्रीय कार्यालयनिहाय योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये “अ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात निगडी प्राधिकरण येथे मदनलाल धिंग्रा मैदान बॅडमिंटन हॉल आणि नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन कोर्ट येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.


“ब” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात चिंचवड येथील फत्तेचंद जैन स्कुल शेजारील पवनानगर बॅडमिंटन हॉल येथे योगा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.


“क” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, येथे योगा कार्यक्रम आयोजीले आहे.


“ई” क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात भोसरीतील आदर्श शाळेजवळील दिघी रोड परिसरातील बॅडमिंटन हॉल आणि गव्हाणे वस्ती बॅडमिंटन हॉल येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.


 “फ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात चिंचवड मधील कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, निगडीतील यमुनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन हॉल येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.


“ग” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पिंपरीगाव येथील कापसे आळीतील काशिबा शिंगे बॅडमिंटन कोर्ट आणि थेरगाव येथील डांगे चौकातील मथाबाई डांगे बॅडमिंटन हॉल या ठिकाणी योगा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे.


“ह” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात संत तुकारामनगर येथील संत तुकाराम पुतळ्यासमोरील सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल आणि नवी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानातील नवी सांगवी बॅडमिंटन कोर्ट येथे योगा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे.


पिंपरी चिंचवड महापालिका आणि योग विद्या धाम संस्था, पिंपरी यांच्या सहकार्याने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

----------------