31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

आषाढीवारीत ‘संवादवारी ’ ; लोककल्याणकारी योजनांच्या जागरास नागरिकांचा प्रतिसाद

पुणे, ता. २ : आषाढीवारीत राज्य सरकारने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांनी होण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे 'संवादवारी' या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी (ता. २) कदम वाकवस्ती आणि सासवड येथेआयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या उपक्रमात गुणवत्तापूर्वक महाराष्ट्राच्या मातृभाषेचे जतन आणि संवर्धनाच्या अनुषंगाने राज्य सरकारचे सुरू असलेले प्रयत्न, शिक्षण उज्वल भविष्याचे संवर्धन, आदर्श आश्रम शाळा आदी शिक्षण विषयक योजना, आरोग्य विभागाच्या विविध उपचारपद्धती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे अभियान आदी आरोग्यविषयक योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत.


महिलांसाठी सुरू केलेली महिला सन्मान योजना, आई महिला पर्यटन धोरण, माता तसेच बालकांसाठीच्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, जागरूक पालक सदृढ बालक अभियान आदी योजना, प्रधान मंत्री आवास-ग्रामीण, मोदी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अनुदान योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, अमृत महाआवास अभियानाद्वारे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आहे.


 आपत्ती व्यवस्थापन आणि बाधितांना मदत, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी भवन बांधणी, बाजार समित्यांना देण्यात येणारे अनुदान, ई-नाम, एक रुपयात पीक विमा योजना, नमो शेतकरी महासन्मान शेतकरी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आदींची माहिती शेतकरी वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे.


 युवांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रोजगार मेळावे, मिशन लक्षवेध, सर्व घटकांसाठी सवलतीच्या दरात तीर्थस्थळांचे दर्शन घडवून आणणारी एसटीसंगे तीर्थाटन योजना, सामाजिक सुरक्षेच्या मुख्यमंत्री वयोश्री योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तृतीयपंथीय धोरण २०२४ आदी योजना, राज्य पर्यटन पुरस्कार योजना, महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियान, वस्त्रोद्योग विभागाची कॅप्टिव्ह मार्केट योजना आदी योजनांबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ तसेच पथनाट्य व प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात येत आहेत.


 दिलीप विश्वनाथ पाटील, अहमदपूर, जि. लातूर- आषाढीवारीच्या निमित्ताने राज्य सरकारच्यावतीने विविध योजनांची माहिती देण्यासाठी 'संवादवारी' उपक्रम आयोजित केला आहे. या प्रदर्शनात माहिती देण्यात आलेल्या योजनांचे लाभही आम्ही घेतले आहेत. जनतेसाठी या योजनांचा फायदा करुन घ्यावा.


 आनंद शिंदे, ता. आंबेजोगाई, जि. बीड- संवादवारी उपक्रमाअतंर्गत सादर करण्यात येणारे पथनाट्य अतिशय उत्कृष्ट असून असे कार्यक्रम वारंवार सुरू ठेवावेत.

-------------