आकाशचिन्ह विभागाकडून फलकांचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी पूर्ण
पिंपरी, ता. २२ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत नविन जाहिरात फलकांना परवानगी देणे जाहिरात फलकांचे नुतनीकरण करणे अशा स्वरूपाची कामे केली जातात. सद्यस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सर्व ठिकाणी असे जाहिरात फलक उभारण्यात आलेले आहेत. उभारण्यात आलेल्या जाहिरात फलकांची सुरक्षितता तसेच जाहिरात फलकांची स्ट्रक्चर स्टॅबिलिटी या विभागाकडुन तपासण्यात आलेली आहेत.
याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने मान्सुनपुर्व काळात अनेक उपाययोजना जाहिरात धारक व आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत करण्यात आलेल्या आहेत. याचाच एक भाग म्हणुन दि. २५/०५/२०२५ ते ०७/०६/२०२५ या कालावधीमध्ये सर्व जाहिरात धारकांना त्यांच्या सर्व जाहिरातीचे फ्लेक्स उतरविणे संदर्भात सुचना दिलेल्या आहेत. परंतु गेल्या २ दिवसांमधील मान्सुन पुर्व मुसळधार पावसाचा अनुभव विचारात घेता सर्व जाहिरात फलकाचे फ्लेक्स दि. २२/०५/२०२५ पासून उतरविण्यास सुरूवात केली आहे, असे आकाशचिन्ह परवाना विभागाने कळविले आहे.
-------------
