26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

आकुर्डीत महानगर आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी, ता. १३ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या हस्ते आकुर्डीतील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.  


प्राधिकरणाच्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट, बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ, टेबल टेनिस, धावणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जमीन व मालमत्ता विभागाचे सह आयुक्त खराडे, अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी - पाटील, प्रमोद कुदळे, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

-----------------