आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी, ता. १३ :पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरातील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसदस्या सुलक्षणा धर, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक संतोष कोराड यासह विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
प्रल्हाद केशव अत्रे हे माजी विधानसभा सदस्य होते. शिवाय ते लेखक, कवी, नाटककार, विविध वृत्तपत्रांचे संस्थापक, संपादकदेखील होते. यासोबतच त्यांची अनेक विनोदी नाटके देखील गाजलेली आहेत. त्यांचा झेंडूची फुले हा काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहे.
-------------