जिल्हास्तरीय शालेय (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धांना बालवाडीत सुरवात
पिंपरी, ता. ८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय (ॲथलेटिक्स) मैदानी स्पर्धा सोमवारी (ता. ७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, महाळुंगे. या ठिकाणी १४, १७, १९ वर्षे मुले व मुली या वयोगटात आयोजित केलेल्या होत्या. सदर स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांनी केले.
स्पर्धेमध्ये एकूण २५२ शाळांनी सहभाग नोंदविला. एकूण ३३८६ खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धा प्रमुख क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे, स्पर्धा नियंत्रक सोपान खोसे, पंचप्रमुख चंद्रकांत पाटील, पंच शेखर कुदळे, यांनी कामकाज केले.
स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा शिक्षक वाल्मीक पवार, राजेंद्र सोनवणे, सुनिता पालवे, सुनील ओव्हाळ, विजय लोंढे, दीपक जगताप, मंगल जाधव, कविता पाचरणे, नामदेव कोकणे यांनी कामकाज केले.
स्पर्धा कालावधीमध्ये अनिता केदारी यांनी भेट देऊन खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धा दिनांक १० तारखेपर्यंत सुरु राहणार आहेत.
स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे -
* ३००० मीटर धावणे १७ वर्षाखालील मुली -
१ . धनश्री दशरथ लव्हाळे - श्री साईनाथ महाराज मा. वि.
२ . सचिन धायगुडे - ज्ञान प्रबोधिनी विद्यालय निगडी.
३. अनुष्का अनिल कुंभार - जय हिंद हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज
३००० मीटर धावणे १९ वर्षाखालील मुली-
१. सखुबाई कुमार चव्हाण - श्रीमती गेंदीबाई चोपडा विद्यालय चिंचवड.
२. वायभट्ट मयुरी मच्छिंद्र - एम एम विद्यालय काळेवाडी.
३. बिरादार साक्षी अंगत - एम एम विद्यालय काळेवाडी.
गोळाफेक १९ वर्षाखालील मुली -
१. प्रथा कानसकर - डॉ. डी. वाय. पाटील जुनियर कॉलेज पिंपरी.
२. प्रणाली सुपे - एस. बी. पाटील ज्युनिअर कॉलेज रावेत.
३. समता कांबळे - राजमाता जुनिअर कॉलेज भोसरी
गोळाफेक १७ वर्षाखालील मुली -
१. स्वरजिसुली दैमारी - आर्मी पब्लिक स्कूल.
२. अविषा अनिल गव्हाळे - ज्ञान प्रबोधिनी निगडी.
३. निहारिका रुपेश कुमार ढाणे - ज्ञान प्रबोधिनी निगडी.
१७ वर्षाखालील मुली ३००० मीटर धावणे -
१ . धनश्री दशरथ लव्हाळे - सयाजीनाथ विद्यालय चर्होली.
२ . सई सचिन धायगुडे - ज्ञान प्रबोधिनी निगडी.
३ . अनुष्का अनिल कुंभार - जय हिंद हायस्कूल पिंपरी.
गोळाफेक १४ वर्षाखालील मुली
१. ईश्वरी मनेश तिजोरे - सिटी प्राइड स्कूल मोशी.
२. आर्या राहुल गोखले - वॉल नट स्कूल.
३. सई ईश्वर मेंडगे - नवमहाराष्ट्र प्रा. वि. रुपीनगर.
-----
