22.45°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत हुधान मोघे प्रथम


पिंपरी, ता. २३ : १७ वर्षाखालील जिल्हास्तर शालेय बुद्धिबळ स्पर्धेत हुधान मोघे प्रथम, विहान मेहेरा द्वितीय तर श्रेयस पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय १७ वर्षाखालील शालेय बुध्दीबळ स्पर्धेचे आयोजन १९ ते २२ ऑगस्ट २०२४ दरम्यान महानगरपालिकेच्या आकुर्डी येथील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल स्केटिंग मैदान आणि पिंपरीमधील मासुळकर कॉलनी येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला.  


या स्पर्धेत वाकड येथील इंदिरा नॅशनल स्कूलच्या हुधान मोघे याने प्रथम स्थान पटकावले. तसेच वाकड येथील विसडोम वर्ड स्कुलचा विहान मेहेरा द्वितीय ठरला, तर रहाटणी येथील एस.एन.बी.पी. स्कूलचा श्रेयस पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिला. वेणुनगर, वाकड येथील इंफंट जिजस हायस्कूलचा ललित आदित्य अय्यनार बुभीनाथन आणि सांगवी येथील लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलचा निशांत जवळकर हे स्पर्धक अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिले. या स्पर्धेस खेळाडूंचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला.


 ------------