रमणलाल लुंकड यांना व्होकेशनल एक्सलन्स सर्व्हिस ॲवार्ड पुरस्कार
पिंपरी, ता. १७ : रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या झोन २ च्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रमणलाल लुंकड यांना " व्होकेशनल एक्सलन्स सर्व्हिस ॲवार्ड '' यांना नुकताच रावेत येथे प्रदान करण्यात आला.
लुंकड यांनी नाशिक येथील सामन गाव येथे मातोश्री वृद्धाश्रमास स्वखर्चाने एका इमारतीचे बांधकाम केले असून मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या नगर येथील अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाला स्वखर्चाने एक इमारत बांधून देत आहे. लुंकड यांना जैन समाजाचा अति प्रतिष्ठित भामाशा पुरस्कार, समाजरत्न,चिंतामणी ज्ञानपीठाचा गुरुजन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
या कार्यक्रमात रोटरी निगडी क्लबच्या वतीने १४ ट्रिज फाउंडेशनचे अध्यक्ष प्रवीण भागवत यांना देखील व्यावसायिक नैपुण्य सेवा पुरस्काराने गौरवण्यात आले. रोटरीच्या प्रांतपाल मंजू फडके, प्रांतीय व्होकेशनल संचालक वसंत मालुंजकर, हिरामण बोत्रे, रोटरी क्लब ऑफ़ निगडीचे अध्यक्ष हरबिंदरसिंग दुल्लत,
सहाय्यक प्रांतपाल मेहुल परमार, विजय काळभोर, आर के एल ग्रूपचे संचालक रविंद्र लुंकड आदी उपस्थित होते. सविता राजापूरकर यांनी सूत्रसंचालन केले. हरबिंदर सिंग यांनी आभार मानले.
-----------