अमित गोरखे यांनी घेतली विधान परिषदेचा सदस्यत्वाची शपथ
पिंपरी, ता. २८ : भारतीय जनता पक्षाने दिलेल्या संधीमुळे अमित गोरखे यांनी विधान परिषदेचा सदस्य म्हणून शपथ घेतली, त्याप्रसंगी विधान परिषदेच्या अध्यक्ष नीलमताई गोऱ्हे, नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर, परिणय फुके , मिलिंद नार्वेकर व इतर सदस्य उपस्थित होते.
शपथ घेताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताच्या संविधानाला स्मरण करून नमन केले. तसेच महाराष्ट्राचे आमचे नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस व माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले.
------------