24.67°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

क्रषिपरंपरेतील योगसाधना

क्रषिपरंपरेतील योगसाधना

आजच्या विज्ञानयुगाच्या स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी आपले शारीरिक आणि मानसिक संपूर्ण आरोग्य उत्तम रहाणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आपली आणि आपल्या कुटूंबाची प्रगती आणि भरभराट उत्तम असण्याची प्रत्येकाची इच्छा असते. यासाठीच आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे.

यासाठीच योगसाधना करणे ही आता जीवनावश्यक गरज आहे. आज योगसाधनेचे महत्व वेगळे सांगण्याची गरज नाही. ही साधना उत्तम आहे, प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. म्हणूनच संपूर्ण जगाने योग डोक्यावर घेतला आहे.


आपल्या पंतप्रधानांनी २०१४ साली युनोमध्ये “२१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करावा हा प्रस्ताव मांडल्याबरोबर संपूर्ण जगाने तो एकमताने मंजूर केला. यातच योगाचे सर्व महत्व समजून येते.


मार्केटिंगच्या या युगामध्ये योगासने, प्राणायाम, वगैरे संपूर्ण योगसाधनेची माहिती समाजापर्यंत सहजपणे पोहोचते आहे. सुशिक्षित मंडळींना विविध पुस्तके वाचून, युटयूब, गुगल या माध्यमातून योगसाधनेचे फायदे सर्वाना समजलेले आहेत. योगासने आणि योगसाधना करणाऱ्या अनेकांना हे फायदे मिळत आहेत. मात्र यासाठी योगसाधनेचे मुलतत्त्वे जी क्रषिमुनींनी सांगून ठेवली आहेत त्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. योगाचे फायदे सोडाच, त्रास होण्याचीही शक्‍यता असते. म्हणूनच हठयोगाच्या

ग्रंथामध्ये स्वामी स्वात्मारामांनी स्पष्ट लिहिले आहे -


प्राणायामेनं युक्‍तेनं सर्व रोग क्षयो भवेत्‌ |

अयुक्ताभ्यास योगेनं सर्व रोग समुद्भव: ||


अर्थात - योग्य प्राणायाम केल्यास सर्व रोग नष्ट होतात. पण हाच प्राणायाम अयोग्य केल्यास रोग उत्पन्न होतात. म्हणूनच आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने प्राचीन क्रषिमुनींच्या मार्गदर्शनाकडे विशेष लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न.


योगशास्त्राला बरीच प्राचीन परंपरा आहे. रामायण-महाभारत याआधीही वेद-उपनिषदामध्ये योगशास्त्राचे मार्गदर्शन केलेले आहे. मात्र साधारण अडीच हजार वर्षापूवी योगमहर्षि पतंजली यांनी पातंजल योगदर्शन हा ग्रंथ लिहून योगशास्त्रावर विशेष मार्गदर्शन केले आहे. त्यांनी अष्टांगयोग सविस्तर मांडला आहे. यामध्ये योगासनाचा अभ्यास कसा करावा हे पतंजलींनी फक्त ३ श्लोकांमधून (सूत्र)

सांगितले आहे.


सूत्र १) स्थिर सुखम्‌ आसनम | आसन म्हणजे काय व कसे करावे.


सूत्र २) प्रयत्नशैथिल्य अनंतसमापतिभ्याम्‌ | आसने योग करण्यासाठी काय केले पाहिजे, कसे साध्य केले पाहिजे.


सूत्र 3) ततो द्वंद्दानभिघातः | अशा पद्धतीने आसने केल्यावर काय फायदा होतो.


अतिशय योग्य आणि मार्मिक मार्गदर्शन महर्षि पतंजलीचे आहे.


सूत्र १) जसे आपण खेळताना किंवा इतर व्यायाम करताना हालचाली करतो. अशा घाईत, जोर देऊन

कोणतेही योगासन करू नये.

योगासने संथगतीने, सावकाश करावी. आपल्याला झेपेल एवढाच ताण घ्यावा. अनावश्यक

ओढाताण, जोरजबरदस्ती अजीबात करू नये. आपल्या वयाप्रमाणे झेपेल असे करावे.

म्हणजेच आसने केल्यावर त्यामध्ये स्थिरता असावी आणि आनंद सुख याचा अनुभव घ्यावा.


सूत्र २) अशा पध्दतीने स्थिर आणि सुखकारक आसन जमण्यासाठी काय करावे ?

प्रथम आपणास जे आसन करायचे ती आसनस्थिती सावकाश हालचाली करीत करावी. जमेल

तेवढाच ताण घ्यावा. नंतर त्या आसनामध्ये थांबून मनाने आपल्या शरीर अवयवांकडे पहात

अवयव सैल सोडण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारे ताण कमी झाल्यावर मनामध्ये ईश्‍वराचे

स्मरण करावे.


अशा प्रकारे पतंजलींच्या मार्गदर्शनाप्माणे कोणतेही आसन करताना घाई, गडबड, जोर

जबरदस्तीने न करता, संथ सावकाश करावे आणि झेपेल तेवढाच ताण घेऊन ईश्वराशी एकरूप

व्हावे.


असे केल्यावरच आसनाचे परिपूर्ण फायदे मिळतील. साधारणपणे, आसनांचे फायदे सांगताना

शरीराच्या आजारांबद्दलच बोलले जाते. रक्‍तदाब, हृदयविकार, मधुमेह नियंत्रणात येईल, वगैरे,

वगैरे.


परंतु पतंजलींनी सांगितलेले फायदे वेगळेच आहेत आणि विशेष आहेत. आजार कमी होणे आणि

स्वास्थ्य लाभणे हे आसनांचे 508 8७5 आहेत. मुख्य परिणाम पतंजली सांगतात - "ततो

दवंद्दानभिघातः |' अर्थात प्रपंचामध्ये आपण मनातील विचारांच्या द्वंद्वामुळेच दुःखी असतो. आपले

मन समाधानी कधीच नसते. कितीही मिळविले तरी अजून पाहिजेच असते. मिळणार नाही

माहीत असले तरीही हाव सुटत नाही. हे वाईट - ते चांगले, त्याला मिळाले मला - मिळाले

नाही, त्याचे चांगले - माझे वाईट ही द्वंद्द चालूच रहातात. यामुळेच तणावग्रस्त होऊन अनेक

आजार बळावतात. कारण ₹/₹४ ०६5६५5६115 २६18४ २5४७-०50॥॥॥1॥८ |


पतंजलींच्या पद्धतीने योगासने केल्यास ही अशी दुःखे कमी होतील आणि हीच आपली खरी दुःखे

आहेत. मनाची अस्थिरता, वखवख, हव्यास, आसक्ती, राग, लोभ, मोह, मत्सर अशा वृत्तीनेच आपण दुःखी

आणि आजारी असतो. पतंजलींनी सांगितल्या प्रमाणे योगासने केल्यास सुख आणि दुःख अशी मनाची द्वंद्व

सहन करण्याची ताकद वाढेल. किंबहुना दुःखाचे रूपांतर सुखात करण्याची ताकद योगाभ्यासात आहे.


म्हणूनच योगसाधना त्रद्षषिपरंपरेतील मार्गदर्शनाप्रमाणे योगाचा योग्य पद्धतीने करणे आवश्यक

आहे. पद्धत बदलली की फायदे दूरच उलट नुकसान झालेले अनुभवास येईल.


माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे म्हणजे योग


म्हणूनच साधना “गुरूपदिष्ट मार्गेणं |” अशीच करावी.


- योगाचार्य प्रमोद निफाडकर

योगविद्याधाम पिंपरी चिंचवड

------------