38.57°C Pune
Monday, May 20
image

मतदान जनजागृतीसाठी मोटार, बाईक फेरीचे आयोजन

पिंपरी, ता. ३ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता दिनांक १३ मे २०२४(सोमवार) रोजी ३३-मावळ, ३४-पुणे व ३६-शिरुर या मतदारसंघात मतदान होत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मोठया प्रमाणावर मतदार जनजागृतीचे (SVEEP) अनुषंगाने मतदारांना मतदानाचे आवाहन करणेकरीता मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे व मा.आयुक्त, पिं.चिं.मनपा यांचे उपस्थितीत शनिवार (ता. ०४ ) सकाळी ८. वा. मोटार बाईक फेरीचे आयोजन करणेत आलेले आहे. 

 मोटार- बाईक फेरी ही भक्ती-शक्ती चौक,निगडी येथून सुरु करणेत येणार असून प्रथम निगडी प्राधिकरण, तद्दनंतर महानगरपालिकेचे अ क्षेत्रीय कार्यालय समोरुन वाल्हेकरवाडी, तेथून उजवीकडे वळून आदित्य बिर्ला हॉस्पीटल समोरून डांगे चौक, डांगे चौकातून डावीकडे वळून जगताप डेअरी चौक, तेथून डावीकडेवळून, शिवार गार्डन समोरुन कोकणे चौकातून रहाटणी चौकात, तेथून डावीकडे वळून काळेवाडी रस्त्याला, तेथून उजवीकडे वळून डी-मार्टचे समोरुन एम्पायर स्क्वेअर समोरुन डावीकडेवळून, चिंचवड स्टेशन चौक, तेथून यु -टर्न घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन मुख्यालय याठिकाणी मोटार बाईक रॅलीची सांगता होणार आहे. 

------------