40.19°C Pune
Monday, May 20
image

संतोष घोणे यांना फ्रांसच्या विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान

पिंपरी, ता. ३ : निगडी येथील संतोष घोणे यांना दि थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी पॅरिस फ्रांस या विद्यापीठाने पीएच.डी. पदवी बहाल केली. घोणे यांनी '' बिझनेस मॅनेजमेंट रेफरन्स ह्युमन रिसोर्स ॲंड फॅसिलिटी सर्व्हिसेस '' या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट पदवी मिळवली. 

थेम्स विद्यापीठातून संतोष घोणे हे या विषयामध्ये पदवी मिळविणारे भारतातील उद्योजक आहेत. यासाठी प्रा. राकेश मित्तल यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. थायलंड येथे झालेल्या आशिया- पॅसिफिक शैक्षणिक परिषदेत, आदीपू विद्यापीठाचे प्रमुख डॉ जिदप्पा थेवारिन, थेम्स विद्यापीठाचे ॲकॅडमीक संचालक डॉ इर्विन डेलीन टोरस यांच्या हस्ते हि पदवी बहाल करण्यात आली. 

 

संतोष घोणे यांना आशिया पॅसिफिक एज्युकेशन समीट मध्ये आशिया आयकॉनिक पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी आजतागायत ३०० कंपन्यांना सुमारे ६ हजार कुशल कामगार पुरवठा केला आहे. तसेच ते औद्योगिक कामगार सेवा, सुरक्षा सेवा, कामगार संपर्क आणि प्लेसमेंट सेवा पुरवठा करत आहेत.

----------