32.86°C Pune
Monday, May 20
image

यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या शुभम थिटेचा पीसीसीओईमध्ये सत्कार


पिंपरी, ता. २८ : '' पीसीसीओईचा माजी विद्यार्थी शुभम भगवान थिटे याने यूपीएससी परीक्षेत मिळविलेले उल्लेखनीय यश कौतुकास्पद आहे. त्याचा पीसीईटी व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो '', अशा भावना पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी नुकत्याच आकुर्डी येथे व्यक्त केल्या. 

  पीसीसीओईचा २०१८ च्या मेकॅनिकल विभागाचा माजी विद्यार्थी शुभम थिटे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. त्याचा सत्कार काळभोर यांच्या हस्ते ट्रस्ट कार्यालयात करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख आदी उपस्थित होते.

 यावेळी काळभोर म्हणाले, '' ३३ वर्षापूर्वी स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील कॅम्पस मध्ये अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन अशा विविध शाखांमध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर उच्च व आधुनिक शिक्षण देण्याची व्यवस्था आहे. तसेच रावेत यथील कॅम्पस मध्ये '' केजी टू पीएचडी '' पर्यंत शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळेगाव येथील एनएमआयटी या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्यवस्थापन देखील पीसीईटी करीत आहे. पुणे मुंबई महामार्ग लगत वडगाव मावळ जवळील साते येथे पिंपरी चिंचवड विद्यापीठ संकुलात मागीलवर्षी पासून सुरू झालेल्या अभियांत्रिकी, व्यवस्थापनासह विविध शाखांमधून सुमारे बाराशे विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. पीसीईटीच्या सर्वच कॅम्पसमध्ये आधुनिक तंत्रज्ञान युक्त उच्च दर्जाच्या प्रयोगशाळांसह उच्चविद्या विभूषित प्रशिक्षित प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास कार्य तत्पर आहेत. नेहमीच्या शैक्षणिक अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षा व तसेच इतर उच्च शिक्षणासाठीच्या परीक्षा तयारीदेखील येथे करवून घेतली जाते. यासाठी स्टडी सर्कल नावाने स्वतंत्र क्लबहि बनविण्यात आला आहे. महाविद्यालयातून आत्तापर्यंत ३ माजी विद्यर्थ्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली असून बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी एमपीएससीमध्ये यश मिळवले आहे. 

------------------------------------------